गुन्हेगारी कथेच्या प्रभावामुळे अल्पवयीन मुलांकडून तरुणाची हत्या !
नवी देहली येथील जहांगीरपुरी भागातील बाबू जगजीवन राम मेमोरियल रुग्णालयात ३ अल्पवयीन मुलांनी एका २४ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलांना अटक करण्यात आली आहे. या मुलांना गुन्हेगारीच्या जगात प्रसिद्ध व्हायचे होते. त्यांनी स्वतःची गुन्हेगारी टोळीही बनवली होती. ‘पुष्पा’ आणि ‘भौकाल’ यांसारखे चित्रपट अन् ‘वेब सीरिज’ यांत चित्रित केलेल्या गुंडांच्या जीवनशैलीचा आमच्यावर प्रभाव आहे’, असे या अल्पवयीन आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हत्या केल्यानंतर एक व्हिडिओही बनवला आणि तो ‘इन्स्टाग्राम’ ‘अॅप’वर प्रसारित केला.
(संदर्भ – sanatanprabhat.org)