अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ
श्रीनगर – अमरनाथ यात्रेला १ जुलै पासून प्रारंभ होणार आहे. ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ९ जून २०२३ या दिवशी घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत यात्रेसाठी केलेल्या सुरक्षा सिद्धतेचा आढावा घेतला. या बैठकीत जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल आणि सुरक्षायंत्रणांचे प्रमुख सहभागी झाले होते. ‘श्री अमरनाथ श्राईन बोर्ड’ने यात्रेच्या कालावधीत अनेक खाद्यपदार्थांच्या वापरावर बंदी घातली आहे.
यंदाची अमरनाथ यात्रा 1 जुलै पासून सुरू होऊन ती 15 ऑगस्ट पर्यंत चालेल असं काल जाहीर करण्यात आलं.#Amarnaathyatra#अमरनाथयात्रा pic.twitter.com/FPcR6qMAlu
— AIR News Pune (@airnews_pune) March 8, 2019
अमरनाथ यात्रा अत्यंत दुर्गम पहाडी रस्त्यांवरून जाते. गेल्या काही वर्षांपासून या यात्रेला आतंकवादी लक्ष्य करत आहेत. (अमरनाथ यात्रेच्या रस्त्यांवर आतंकवाद्यांच्या आक्रमणाचे सावट असणे, हे लज्जास्पद होय ! – संपादक) त्यामुळे या कालावधीत अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रेकरूंना तुकड्यांमध्ये पाठवले जाते.