राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांची घोषणा
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १० जून या दिवशी देहली येथील पक्षाच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाच्या दिवशी बोलतांना केली. आगामी निवडणुकीचे संपूर्ण दायित्व या दोघांवर असणार आहे.
अजित पवारांवर सध्या कोणतीही नवी जबाबदारी नाही, वाचा घोषणांची पूर्ण यादी!#Maharashtra #maharashtranews #ajitpawar #ncp @AjitPawarSpeaks https://t.co/NvtIoEb1y5
— LoksattaLive (@LoksattaLive) June 10, 2023
सध्या तरी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कोणतेही दायित्व देण्यात आलेले नाही. सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांचे दायित्व देण्यात आले आहे, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गोवा अन् गुजरात या राज्यांचे दायित्व असेल.