पाकिस्तानात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि बळजोरीने विवाह !
गेल्या २ वर्षांत अल्पसंख्यांक समुदायाच्या महिलांवरील अत्याचारांच्या २०२ घटनांपैकी १२० पीडिता या हिंदु !
कराची (पाकिस्तान) – येथील सिंध प्रांतात एका १४ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर तिचा बळजोरीने एका मुसलमान मुलाशी विवाह लावण्यात आला. पीडितेचे नाव सोहना शर्मा असून काझी अहमद याने तिचे अपहरण करून धर्मांतर केले. तिच्या स्वाक्षरीने विवाह प्रमाणपत्रही सिद्ध करण्यात आले आहे. यातून तिने स्वेच्छेने मुसलमानाशी विवाह केला, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणावर सिंध प्रांताच्या विधानसभेत आवाज उठवण्यात आला असून प्रांतीय मंत्री मुकेशकुमार चावला यांनी आश्वासन दिले की, सरकारी कायद्यांच्या कार्यवाहीसाठी आवश्यक उपाय काढण्यात येतील.
पाकिस्तान में 14 वर्षीय हिंदू लड़की का अपहरण, धर्मांतरण फिर जबरन शादी, सिंध विधानसभा में छिड़ी बहस#Pakistan #Minority #HindusInPakistan https://t.co/7xZbZB8gH7
— Dainik Jagran (@JagranNews) June 10, 2023
सिंध आणि पंजाब प्रांतात अत्याचारांची बहुतांश प्रकरणे
‘ह्यूमन राइट्स विदाउट फ्रंटीयर्स’च्या एका अहवालानुसार पाकिस्तान राजकीय आणि आर्थिक दु:स्थितीसह बलपूर्वक विवाह आणि धर्मांतर यांसारख्या मोठ्या समस्यांनीही ग्रस्त आहे. पाकिस्तानच्या ‘ख्रिश्चन सॉलिडॅरिटी वर्ल्डवाइड’ या संघटनेची स्थानिक सहसंघटना ‘सेंटर फॉर सोशल जस्टिस’ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२१ आणि २०२२ या २ वर्षांच्या कालावधीत पाकिस्तानात महिला अन् मुली यांच्यावरील अत्याचारांच्या २०२ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यांतील बहुतांश प्रकरणे ही सिंध आणि पंजाब प्रांतांतील आहेत. यामध्ये १२० हिंदु महिला आणि मुली, ८० ख्रिस्ती आणि २ शीख महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जातींतील हिंदु मुली यांच्यावर अधिक प्रमाणात आघात होत आहेत. एकूण २०२ पीडित महिला आणि मुली यांपैकी किमान १३३ जणी या १८ वर्षे वयापेक्षा अल्प असलेल्या म्हणजे अल्पवयीन मुली आहेत.
संपादकीय भूमिका
|