कर्नाटकात रा.स्व. संघाला देण्यात आलेल्या शेकडो एकर भूमींची अवलोकन करणार ! – काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना रा.स्व. संघ आणि तिच्याशी संबंधित अन्य संघटना यांना देण्यात आलेली शेकडो एकर सरकारी भूमीचे अवलोकन करण्यात येईल, असे कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी म्हटले आहे. तसेच भाजप सरकारच्या काळातील काही निविदाही रहित करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Karnataka govt to review land allocations to RSS-linked organisations, says minister | @nagarjund https://t.co/R8XfSzmAFn
— IndiaToday (@IndiaToday) June 9, 2023
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचा हिंदुद्वेष. काँग्रेसने आतापर्यंत वक्फ आणि मुसलमानांच्या अन्य संघटना यांच्यावर सुविधांची जी खैरात केली, त्याविषयी काँग्रेसवाल्यांना काय म्हणायचे आहे ? |