डोंबिवली येथे दीड वर्षाच्या हिंदु मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणार्या सलीमला अटक !
डोंबिवली – साईनगर-शिर्डी एक्सप्रेसमध्ये आईसमवेत झोपलेल्या दीड वर्षाच्या हिंदु मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारा सलीम पठाण याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुलीचे वडील लघुशंका करायला गेल्यावर सलीमने अपहरणाचा प्रयत्न केला; मात्र सतर्क प्रवाशांनी त्याला पकडून चोप दिला. (सतर्क आणि तत्पर असणार्या प्रवाशांची कृती कौतुकास्पदच ! – संपादक)
सलीमने मुलीला उचलल्याचे पाहून प्रवाशांनी त्याला हटकले; पण तो कोणतीही समाधानकारक उत्तरे देत नव्हता. त्यामुळे रेल्वेच्या डब्यात गोंधळ झाला. मुलीच्या आईला जाग आली, तेव्हा तिने ती स्वतःची मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रवाशांनी त्याला पोलिसांच्या कह्यात दिले. सलीमकडे तिकीटही नव्हते. (रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणारे धर्मांध ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअशा धर्मांध मुसलमानांच्या विरोधात कठोर कारवाईच व्हायला हवी ! |