अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे मुलांच्या खेळातील भांडणातून धर्मांधांनी घडवली दंगल !
• साहाय्यक पोलीस निरीक्षकांवर तलवारीने आक्रमण • ६ पोलीस घायाळ • दत्तमंदिराच्या दिशेनेही दगडफेक !• पोलिसांनी प्रतिकार करणार्या हिंदूंना रोखले ! • ६१ जणांवर गुन्हा नोंद; २९ जणांना अटक |
अमळनेर – येथील सफार गल्लीतील जिनगर गल्लीत रात्री मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेले भांडण वाढत जाऊन धर्मांधांनी हिंदूंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने दंगल उसळली. (धर्मांधांनी दगड गोळा करून ठेवलेलेच असतात, हेच नेहमी लक्षात येत असल्याने मधून मधून धर्मांधांच्या घरांवर धाडी टाकून ‘दगड आहेत का ?’ ते पडताळले पाहिजे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
दगडफेकीत सहा पोलिस जखमी, तीन दिवस संचारबंदी #Jalgaon #Police #Amalnerhttps://t.co/QIWoqci3td
— Lokmat (@lokmat) June 10, 2023
१. ‘दगडफेक होत आहे’, हे कळताच पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोचले. त्या वेळी धर्मांधांनी दगड, विटा, फरशा यांच्या साहाय्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांवर आक्रमण केले.
२. इरफान जहुर दिलदार याने तलवारीने साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंह यांच्यावर आक्रमण केले. त्यांनी तो वार चुकवला; परंतु त्यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे वृत्त आहेे.
३. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून घेतली. या वेळी हिंदूंनीही दंगलखोरांना प्रत्युत्तर दिले. आतापर्यंत ६१ जणांना अटक करण्यात आली असून २९ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येथे १४४ कलम लागू करण्यात आले असून २ दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
४. चिंदर गल्लीतील दगडफेकीनंतर शहरात अन्यत्र दंगलीचे लोण पसरले. पानखिडकी, खड्डाजीन, सुभाष चौक, गांधीपुरा या परिसरांतही हिंदु-मुसलमान यांच्यात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली.
५. पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणली. रस्त्यांवर विटांचा मोठा खच पडला होता. सीसीटीव्ही तपासून पोलीस दंगलीमागचे कारण शोधत आहेत, तसेच आरोपींचा शोध घेत आहेत.
६. आवश्यकता वाटल्यास संचारबंदीत आणखी वाढ केली जाणार आहे. शहरातील नागरिकांनी या काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा, तसेच विवाह, अंत्यविधी आदींसाठी संचारबंदी आदेश लागू नाही.
पवन चौक येथे प्रतिकार करणार्या हिंदूंना पोलिसांनी रोखले !आठवडा बाजार भागात तिरंगा चौकातील दत्त मंदिरावरही धर्मांधांनी दगडफेक केली. ही गोष्ट पवन चौक भागातील हिंदु मुलांना समजताच ती मुले प्रतिकार करण्यास बाहेर येत असतांना पोलिसांनी मात्र त्यांना रोखून धरले. त्यामुळे ‘‘पोलीस असून काही उपयोग नाही. पोलीस हिंदूंना रोखतात; मात्र मुसलमानांना रोखू शकत नाहीत’’, अशी प्रतिक्रिया तेथील हिंदु तरुणांनी व्यक्त केली. (हिंदूंनी मार खायचा, प्रतिकारही करायचा नाही, अशी स्थिती हिंदूंची झाली आहे. पोलिसांनी धर्मांधांवर वचक निर्माण केला असता, तर हिंदूंवर प्रतिकार करण्याची वेळ आली नसती, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|