आनंदी, निरागस आणि साधकांना साधनेत साहाय्य करणार्या पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल केतन पाटील (वय २६ वर्षे) !
उद्या ज्येष्ठ कृष्ण अष्टमी (११.६.२०२३) या दिवशी पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल केतन पाटील यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पुणे येथील त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. स्नेहल केतन पाटील यांना २६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. श्री. स्नेहल कांबळे, हडपसर, पुणे.
१ अ. आपलेसे करणे : ‘स्नेहलताईंनी प्रथम भेटीतच मला आपलेसेे केले. त्यांनी मला वेळ देऊन सामाजिक प्रसारमाध्यमांची सेवा शिकवली. ताई नेहमी आपुलकीने विचारपूस करते आणि माझ्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांविषयी विचारते.
१ आ. निरागसता आणि प्रांजळपणा : ताईच्या बोलण्यात सहजता आणि निरागसता आहे. सेवेतील एखादे सूत्र कळवायचे राहिले असेल, तर ती लगेच क्षमायाचना करते. ताईच्या बोलण्यातून कधी अहं जाणवत नाही. ती नेहमी ‘साधक किती छान सेवा करतात !’, असे कौतुक करते. ती आम्हाला ‘सेवेत काही अडचण नाही ना ?’, असे स्वतःहून विचारते.’
२. श्री. अविनाश देसले, पिंपरी चिंचवड, पुणे
‘सामाजिक प्रसारमाध्यमांची सेवा भावपूर्ण केल्याने आपली आणि सहसाधकांची साधना होते’, हे ताई आमच्या मनावर बिंबवत असते.’
३. सौ. प्रार्थना बुवा, पुणे
‘प्रत्येक साधकाने साधनेत लवकर प्रगती करावी’, अशी ताईला तळमळ असते. त्यामुळे ती आम्हा साधकांना सर्वतोपरी साहाय्य करते. ताई तत्परतेने आणि प्रेमाने चुका सांगून आम्हाला अंतर्मुख करते.’
४. सौ. अर्चना पाटील, पुणे
अ. ‘स्नेहलताई सत्संगात भावजागृतीचा प्रयोग घेते. तेव्हा ‘आम्हाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतात’, असे मला जाणवते.
आ. ताईच्या बोलण्यातून पुष्कळ वेळा बालकभाव अनुभवता येतो. तेव्हा आम्हाला सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांची आठवण येऊन ‘त्याच बोलत आहेत’, असे वाटते.
इ. ताई नेहमी आनंदी आणि उत्साही असते. ताईला कधीही भ्रमणभाष केला, तरी तिचा आवाज थकलेला जाणवत नाही. ‘तिच्याशी बोलल्यानंतर आमचे साधनेचे प्रयत्न आपोआपच होऊ लागतात’, असे जाणवते.’
५. सौ. प्रगती नगरकर, तळेगाव, पुणे
‘स्नेहलताईशी बोलल्यावर माझ्या मनातील निरुत्साह आणि नकारात्मक विचार आपोआप न्यून होऊन मला आनंद मिळतो. ताई सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते.’
६. श्री. प्रणव अरवतकर, सातारा रस्ता, पुणे.
६ अ. साधकांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांना चुका सांगणे : ‘आमच्याकडून सेवेत प्रथमच चूक झाली असल्यास ताई ‘असू दे’, असे सहजतेने म्हणते. त्यावर ती कधीच प्रतिक्रिया देत नाही. ‘कोणत्या चुकीसाठी समोरच्या साधकाला काय सांगायचे ?’, हे ताई अचूक जाणते. चूक गंभीर असल्यास लगेच ती आम्हाला चुकीची जाणीव करून देते.
६ आ. चूक सांगतांना ‘साधकांची साधना व्यय होऊ नये आणि त्यांनी साधनेत प्रगती करावी’, असा विचार असणे : ताईचा प्रत्येक साधकाच्या प्रकृतीचा अभ्यास आहे. ज्या वेळी साधकांची स्वीकारण्याची स्थिती असते, त्या वेळी ताई त्या साधकांना त्यांची चूक लक्षात आणून देते. ताईने चूक लक्षात आणून दिल्यावर त्यावर प्रयत्न करून सुधारण्याची दिशा आपोआपच मिळते. चूक सांगतांना ‘साधकांची साधना व्यय होऊ नये आणि साधकांनी साधनेत प्रगती करावी’, असा ताईचा विचार असतोे.’
७. श्री. ऋग्वेद नीलेश जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे), पुणे
७ अ. उत्तम नियोजनकौशल्य : ‘पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने राबवण्यात येणार्या विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीच्या ‘इमेज पोस्ट’ बनवण्याचे आणि प्रसारित करण्याचे नियोजन ताई आधीच करते. त्यामुळे प्रत्यक्ष सेवा ताणविरहित होते. ‘प्रत्येक उपक्रमाची ‘पोस्ट’ कधी बनवायची ? ती कोणत्या दिवशी प्रसारित करायची ?’, याचे ती लिखित नियोजन करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२३)