इचलकरंजी येथे अल्पवयीन युवतीचा विनयभंग करणार्या धर्मांधाला अटक !
कोल्हापूर – अल्पवयीन युवतीचा विनयभंग करून तिची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणारा धर्मांध साद मुजावर (वय २१ वर्षे) याच्यावर ‘पोक्सो’ आणि ‘अॅट्रॉसिटी’ गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
१. ६ मासांपूर्वी साद मुजावर याची युवतीशी सामाजिक माध्यमांतून ओळख झाली. त्याने जवळीक वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला कॉफी शॉपमध्ये नेले. येथे तिला तोंडवळा ‘नकाब’प्रमाणे झाकण्यास भाग पाडून तिची छायाचित्रे काढली. ती प्रसारित करण्याची धमकी देऊन विनयभंग केला.
२. काही दिवसांपूर्वी ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तरुणीच्या बाजूने तक्रार देण्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.