छत्रपती संभाजीनगर येथे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर ६ जणांचा अत्याचार !
छत्रपती संभाजीनगर – इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकणार्या १५ वर्षांच्या मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून तिला आमीष दाखवून तिच्यावर ६ जणांनी आळीपाळीने अत्याचार केला आहे. गेल्या ६ मासांपासून हा सर्व प्रकार चालू होता. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अक्षय चव्हाण असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार !
वर्ष २०२२ मध्ये अक्षय चव्हाण याच्या संपर्कात आल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचे चोरून भ्रमणभाषमध्ये चित्रण केले. हा व्हिडिओ दाखवून आणि प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर पुढेही अत्याचार चालू ठेवला. आपल्या मित्रांनाही मुलीवर अत्याचार करण्यासाठी साहाय्य केले. एका मित्राने तिच्या या परिस्थितीचा अपलाभ घेण्याचे ठरवत तिला समवेत पळून जाण्याचे आश्वासन दिले. १८ मे या दिवशी तिने घरातील २० सहस्र रोख रक्कम, सोन्याचे दागिने, वडिलांचा भ्रमणभाष घेऊन पोबारा केला. रात्री १२ वाजता एकटी रेल्वे स्थानकावर मित्राची वाट पहात उभी असतांना दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी तिला कह्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.