महाराष्ट्रात वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांची संख्या झाली ११४ !
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १८ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !
(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)
मुंबई, ९ जून (वार्ता.) – नागपूर, अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर (नगर) या जिल्ह्यांतील मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केल्यानंतर आता मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील १८ मंदिरांनीही वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील वस्त्रसंहिता लागू करणार्या मंदिरांची संख्या ११४ झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली. ९ जून या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबई येथील श्री शीतलादेवी मंदिरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी श्री जीवदानी मंदिराचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर, कडाव गणपति मंदिराचे विश्वस्त (कर्जत) श्री. विनायक उपाध्ये, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी.एम्. नायर हे उपस्थित होते.
मुंबईसह राज्यभरातील ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागूhttps://t.co/4t28rjCxMX#Mumbai #Temple #rules
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) June 9, 2023
भविष्यात आणखीही मंदिरे वस्त्रसंहिता लागू करतील ! – शशांक गुळगुळे, विश्वस्त, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर देवस्थान
काहीजण मंदिरांमध्ये अंगप्रदर्शन करणारी उत्तेजक, अशोभनीय, असभ्य वस्त्र किंवा फाटलेल्या जीन्स आणि तोकडे कपडे घालून येतात. सात्त्विक वेशभूषा परिधान करून मंदिरात आल्यावर भक्तांना मंदिरातील चैतन्याचा लाभ होतो, तसेच मंदिरातील पावित्र्य, मांगल्य, परंपरा आणि संस्कृती टिकून रहाते, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे. यासाठीच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. भविष्यात आणखीही काही मंदिरे वस्त्रसंहिता लागू करणार आहेत.
या वेळी जीएसबी टेम्पल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर, खजिनदार सौ. कल्पना प्रभु, श्री शीतलादेवी आणि मुरलीधर देवस्थान यांचे पालक विश्वस्त श्री. अनिल परूळकर; श्री भुलेश्वर अन् श्री बालाजी रामजी देवस्थानचे पालक विश्वस्त श्री. दीपक वालावलकर, माहीम येथील श्री दत्तमंदिराचे पुजारी श्री. किशोर सारंगुल आणि श्री वाळकेश्वर मंदिराचे पदाधिकारी श्री. पंकज सोलंकी हे उपस्थित होते.
Why not the #Dresscode_For_Temples ??
Seculars should reply to this:
Dress code works in Mecca and Medina!
Goa’s Francis Xevior Church has a dress code!
Dress code applies in government offices.
There is a dress code for even parties in pub !#मंदिर_वस्त्रसंहिता @Ramesh_hjs pic.twitter.com/l408dnmPGz
— Sunil Ghanwat (@SG_HJS) June 8, 2023
अष्टविनायक मंदिरांतील पाली (जिल्हा रायगड) मंदिरानेही वस्त्रसंहिता लागू केली !
महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांतील एक असलेले रायगड जिल्ह्यातील पाली येथील अष्टविनायक मंदिरामध्ये ९ जूनपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
जीवदानी मंदिरातील वस्त्रसंहितेचे भाविकांकडून स्वागत ! – प्रदीप तेंडोलकर, अध्यक्ष, जीवदानी मंदिर, विरार
वस्त्रसंहितेमुळे कुणीही दर्शनापासून वंचित रहाणार नाही. आपला धर्म भाविकांना समजला पाहिजे, यासाठी वस्त्रसंहिता लागू करावी लागली. जीवदानी मंदिरात आम्ही वस्त्रसंहितेचा फलक त्वरित लावला. जीवदानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू केल्याचे सर्व भाविकांनी स्वागत केले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक –
गौंड सारस्वत ब्राह्मण मंदिर देवस्थानच्या सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू !गौंड सारस्वत ब्राह्मण मंदिर देवस्थानची श्री भुलेश्वर महादेव मंदिर, श्री वाळकेश्वर महादेव मंदिर, श्री बाळाजी रामजी मंदिर (भुलेश्वर), श्री शीतलादेवी मंदिर (माहीम) आणि श्री मुरलीधर मंदिर (कापडबाजार, माहीम) ही ५ मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर देवस्थानने घेतला आहे, अशी माहिती श्री. शशांक गुळगुळे यांनी दिली. |
The Hindu temple is a place of worship.
One’s individual conduct must be according to Dharma there. Here, it is not the individual freedom but the practice of Dharma that is important.#मंदिर_वस्रसंहिता#Dresscode_For_Temples @ShefVaidya pic.twitter.com/wwDrBj797E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 8, 2023
वस्त्रसंहिता लागू करणारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील मंदिरे !
१. श्री शांतादुर्गा देवस्थान, श्री शीतलादेवी देवस्थान, माहीम
२. श्री मुरलीधर देवस्थान, माहीम
३. श्री अष्टविनायक देवस्थान, पाली
४. श्री जीवदानी मंदिर, विरार
५. श्री भुलेश्वर देवस्थान, भुलेश्वर
६. श्री बालाजी रामजी देवस्थान, भुलेश्वर
७. श्री दिवानेश्वर महादेव मंदिर, वसई
८. श्री परशुराम तपोवन आश्रम, वसई
९. श्रीराम मंदिर, धारावी
१०. श्री मुरलीधर मंदिर, शीव
११. हनुमान मंदिर, डोंबिवली (पूर्व)
१२. श्रीराम मंदिर, दावडी, डोंबिवली (पूर्व)
१३. कडव गणपती मंदिर, कर्जत
१४. श्रीराम मंदिर, नागोठणे
१५. श्री जब्रेश्वर महादेव मंदिर, बाणगंगा
१६. श्री वाळुकेश्वर देवस्थान, बाणगंगा
१७. श्री दत्त मंदिर, माहीम
१८. झावबा श्रीराममंदिर, गिरगाव
हे ही पहा –
(सौजन्य : JAMBOO TALKS)
संपादकीय भूमिकामंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्या देवस्थानांचे अभिनंदन ! असा निर्णय भारतातील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक ! |