(म्हणे) ‘इंशाअल्लाह, हिंदुस्थान लवकरच इस्लामी प्रजासत्ताक बनणार !’ – पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शनवारी
पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शनवारी यांना पडले दिवास्वप्न !
(इंशाल्लाह म्हणजे जर अल्लाहची इच्छा झाली, तर…)
इस्लामाबाद (पाकिस्तान) – इंशाअल्लाह, हिंदुस्तान लवकरच इस्लामी प्रजासत्ताक बनणार, असे स्वत:चे हसे करून घेणारे ट्वीट पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शिनवारी यांनी केले आहे. यावरून भारतियांनी त्यांचा निषेध करत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. एकाने ट्वीट केले, ‘इंशाअल्लाह, लवकरच पाकिस्तानच्या इस्लामी प्रजासत्ताकावर भारतातील लोकशाही गणराज्याद्वारे नियंत्रण मिळवले जाईल !’ अन्य एकाने लिहिले की, पाकिस्तानच्या प्रत्येक समस्येवर त्याच्या सीमा भारतामध्ये विलीन करण्यामध्येच उपाय आहे !
InashAllah Islamic Republic of Hindustan very soon ✌️
— Sehar Shinwari (@SeharShinwari) June 7, 2023
याआधीही शिनवारी यांनी देहली पोलिसांना टॅग करत ट्वीट केले होते की, पाकिस्तानमध्ये आतंकवाद प्रसृत करण्यामागे पंतप्रधान मोदी आणि भारताची गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ यांचा हात असून त्यांच्याविरोधात तक्रार प्रविष्ट करायला हवी.
संपादकीय भूमिकायेणार्या काळात पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून पुसले जाऊन अखंड भारत स्थापित होईल ! हीच भगवंताची वास्तविक इच्छा आहे, हे पाकने लक्षात ठेवावे ! |