हापुड (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान युवकाने चंडीदेवीच्या मंदिरात केले नमाजपठण !
हापुड (उत्तरप्रदेश) – येथे कोतवाली क्षेत्रात असलेल्या चंडीदेवीच्या मंदिरात एका मुसलमान युवकाने नमाजपठण केल्याची घटना ९ जूनला पहाट पावणे पाच वाजता घडली. युवक नमाजपठण करत असल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. त्या वेळी मंदिरात उपस्थित लोकांनी त्याला विरोध केल्यावर तो तेथून निघून गेला. मंदिरातील पुजारी त्या वेळी पूजा करत होते. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोपी युवकाच्या विरोधात २४ घंट्यांच्या आत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीतील चित्रीकरण नियंत्रणात घेतले असून युवकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षकांनी दिली.
हापुड़ के चंडी मंदिर में युवक ने पढ़ी नमाज, परिसर को गंगा जल से धोया, पुलिस फोर्स तैनात#Hapur #Namaz #Temple https://t.co/oG0OTurJ6X
— Hindustan (@Live_Hindustan) June 9, 2023
संपादकीय भूमिकाहिंदूंमधील अतीसहिष्णु वृत्तीमुळेच कुणीही येतो आणि त्यांची तीर्थस्थळे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कुणी हिंदू एखाद्या मशिदीत अशा प्रकारे मंत्रपठण किंवा आरती करण्याचा कधी विचारतरी करू शकतो का ? अशा घटना घडू नयेत, असा वचक खरेतर हिंदूंनी निर्माण करायला हवा ! |