पाकला धडा शिकवण्यासाठी आणखी १-२ ‘सर्जिकल स्ट्राइक’ करायला हवेत ! – बनवारीलाल पुरोहित, पंजाबचे राज्यपाल
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचे विधान !
(सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काळजीपूर्वक केलेली सैन्य कारवाई. त्यामुळे लक्ष्य सोडून आजूबाजूच्या परिसराची हानी होत नाही.)
चंडीगड – पाकिस्तान भारतात अमली पदार्थ पाठवत आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध थेट युद्ध लढू शकत नसल्यामुळे तो असे करत आहे. अशा पाकला धडा शिकवण्यासाठी भारताने आणखी १-२ सर्जिकल स्टाइक करायला हवेत. असे केले, तरच पाकिस्तान सुधारेल, असे विधान पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. राज्यपाल पुरोहित हे राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांच्या २ दिवसांच्या दौर्यावर आहेत.
पाकिस्तानकडून भारतात तस्करीसाठी ड्रोन पाठवण्यात येते, त्याविषयी राज्यपाल पुरोहित म्हणाले की, मला १०१ टक्के निश्चिती आहे की, पाकिस्तान सरकार किंवा सैन्य यांच्या सहभागाविना ड्रोनचा वापर शक्य नाही. आपल्या पुढच्या पिढीला व्यसनाधीन बनवण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. अमली पदार्थ शाळांपर्यंत पोचले असून विद्यार्थी त्यांच्या आहारी जात असल्याच्या आणि व्यसन करण्यासाठी घरातून पैसे चोरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. म्हणूनच पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ व्हायला हवे.
Punjab Governor Banwarilal Purohit says surgical strikes should be conducted against Pakistan to teach it a lesson, accuses neighbouring country of pushing drugs into Indian territory
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023