वीर सावरकर उवाच
मिहिरगुल हा भारतावर आक्रमण करणारा हूण राजा होता. तो रुद्रदेवतेचा उपासक होता. म्हणून वैदिक धर्मीय राजाने किंवा जनतेने त्याचे दास्यत्व स्वीकारले नाही. तो स्वधर्मीय असला, तरी राजकीयदृष्ट्या परकीय होता; म्हणून त्याला भारताचा शत्रू मानले आणि भारताचा जो प्रदेश त्याच्या हातात सापडला होता, त्या प्रदेशाला राजकीयदृष्ट्या मुक्त करण्यासाठी त्याच्याशी वैर मांडले.
(साभार : ‘सहा सोनेरी पाने’ ग्रंथातील सोनेरी पान तिसरे)