कुठे पुस्तकप्रेमी पेशवे, तर कुठे सध्याचे शासनकर्ते ?
आज श्रीमंत नानासाहेब पेशवे स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
‘पहिले बाजीराव पेशवे हे जसे तलवार बहादूर होते, तसे ते विद्याव्यासंगीही होते. वेदांत विषयाची त्यांना आवड होती. स्वारीत असतांनाही त्यांच्याजवळ ‘वेदभाष्य’ हा ग्रंथ असे. बाजीरावांचा मुलगा नानासाहेब हेही विद्वान आणि बहुश्रुत होते. नानासाहेबांनी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणांहून पोथ्या मिळवल्या. त्याखेरीज उदेपूर दरबाराशी संधान बांधून तिकडूनही पुष्कळ हस्तलिखित प्रती आणवल्या. वर्ष १७४७-४८ मध्ये धार्मिक पुस्तकांच्या ३६ प्रती आणि १७५५-५६ मध्ये आणखी १५ प्रती मागवल्या. त्यांना महाराष्ट्रातील पुस्तकांचा सुगावा लागायचा. नारी शंकर राजेबहादूर यांचे वास्तव्य कधी कधी नाशिक क्षेत्री असे. म्हणून नानासाहेबांनी त्यास ‘ब्रह्मवैवर्त’ नावाचे पुराण तपास करून स्वतःकडे पाठवण्यास लिहिले.’
– श्री. विजय धामणेकर (तरुण भारत, २०.५.२०००)