रामनाथी येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर ‘हा आश्रम म्हणजे भविष्यातील रामराज्याचे प्रतीकच आहे’, याची जाणीव झाल्याने साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), ‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहाता आला’, हे माझे भाग्य आहे. हा आश्रम म्हणजे जणू भविष्यातील रामराज्याचे प्रतीकच आहे.
आश्रमामधील सेवाकार्य, साधकांची अभ्यासू वृत्ती, संशोधन कार्य आणि साधना हे सर्व पाहिल्यावर ‘हिंदु राष्ट्र कसे येणार ?’, हा मला पडलेला प्रश्न विरून गेला. ३ दिवसांच्या आश्रमातील वास्तव्यामुळे मला माझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. ‘हिंदु राष्ट्र येणार’, ही श्रींची इच्छा आहे’, हे मला मन, बुद्धी आणि चैतन्य यांच्या स्तरावर चांगले पटले आहे.
हिंदु राष्ट्र-निर्मितीसाठी समाजाची मानसिकता सिद्ध करणे आवश्यक आहे. सद्यःस्थितीमध्ये जो तो आपल्याच प्रपंचामध्ये अडकून पडला आहे. भोगवादात अडकून पडलेल्या माणसाला ‘मनुष्यजन्म ईश्वरप्राप्तीसाठी आहे’, याचे विस्मरण झाले आहे. प.पू. गुरुदेव, त्या मानवाला जागृत करण्यासाठी आपण अविरत प्रयत्न करत आहात. तुम्ही आपल्या साधकांना ज्ञानदान करत आहात. तुम्ही घडवलेले साधक समाजात अध्यात्मप्रसाराची सेवा करत आहेत.
‘गुरुदेवा, तुमच्या कृपेने मला मिळालेली अध्यात्मप्रसाराची सेवा मी निष्ठेने पार पाडीन. ‘आपण हिंदु राष्ट्र-स्थापनेचा संकल्प केलेला आहे. आपल्या कृपेमुळे आमचा उद्धार होणार आहे.’
– श्री. मंथन गवस, सिंधुदुर्ग (२.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |