धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी आजूबाजूच्या तालुक्यांत वादळासह गारांचा पाऊस पडणे; पण संतांनी नामजप केल्याने धरणगावमध्ये सभेच्या वेळी पाऊस न पडल्याने सभा निर्विघ्नपणे पार पडणे
‘३०.४.२०२३ या दिवशी धरणगाव (जिल्हा जळगाव) येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाशेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या पूर्वी ४ दिवस जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अवेळी पावसाचा हाहाःकार चालू होता. सभास्थळी दुपारी ३.३० वाजता पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाचा एक थेंबही पडला नाही; याउलट सभा चालू होती, तेव्हा बाजूच्या भुसावळ आणि जामनेर या तालुक्यांत प्रचंड वादळासह गारांचा पाऊस पडला. अनेक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. सभा निर्विघ्नपणे पार पडावी; म्हणून संत नामजप करत होते, तसेच सेवेतील साधक सातत्याने प्रार्थना करत होते. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने सभा निर्विघ्नपणे पार पडली. ‘सभेवर जणू भगवान श्रीकृष्णाचे कृपाछत्र होते’, असे साधकांना जाणवले. ‘भगवंताचा कृपाशीर्वाद आम्हा सर्व साधकांना अनुभवता आला’, त्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. विनोद शिंदे, धरणगाव, जिल्हा जळगाव. (१०.५.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |