लाभले तुला जीवनात विष्णुस्वरूप गुरुदेव ।
ज्येष्ठ कृष्ण षष्ठी (९.६.२०२३) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्या कु. प्रणिता भोर यांचा २४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईने आशीर्वादपर केलेली कविता येथे दिली आहे.
कु. प्रणिता भोर यांना त्यांच्या २४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
सोडून मायेचा पाश ।
केला सर्वस्वाचा त्याग ॥ १ ॥
अर्पण केले गुरुचरणी ।
कृपा संपादन करण्या संत अन् सद़्गुरु यांची ॥ २ ॥
पडतो विसर स्वतःचा ।
ध्यास आहे ईश्वरप्राप्तीचा ॥ ३ ॥
लाभले जीवनात विष्णुस्वरूप गुरुदेव ।
आणतील तेच दिन सोनियाचा, होईल गुरुकृपेचा वर्षाव ॥ ४ ॥
भक्त बनवूनी ठेवा अखंड गुरुचरणी ।
हीच प्रार्थना ईश्वरचरणी ॥ ५ ॥
– सौ. सीमा भोर (कु. प्रणिताची आई), कल्याण, जिल्हा ठाणे. (२१.५.२०२३)