कोल्हापुरात औरंगजेबाचा ‘स्टेटस’ कुणी सिद्ध केला ? याचे अन्वेषण होणार ! – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
कोल्हापूर – कोल्हापुरात औरंगजेबाचा ‘स्टेटस’ कुणी सिद्ध केला ?, याचे सायबर विभागाकडून अन्वेषण होणार आहे. कोल्हापुरात झालेल्या दंगल प्रकरणी ३६ जणांना अटक केली आहे. या दंगलीत अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. त्यांतील ३ अल्पवयीन युवकांना कह्यात घेतले असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. ‘ही दंगल घडवण्याच्या मागे शहराबाहेरील कुणाचा हात आहे का ?’, याचेही अन्वेषण होणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली.
पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले, ‘‘बंद दुकानांबाहेर जे सीसीटीव्ही होते, त्यातून छायाचित्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ज्यांनी बंद पुकारण्याचे आवाहन केले, त्यांचे भाषण पडताळले जाईल. त्यात ‘त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले का ?’, हे पडताळले जाईल. भाषणांचे ध्वनीचित्रीकरण आमच्याकडे आहे.’’