सातारा येथे गुरुपौर्णिमा विशेष स्मरणिकेचे पू. योगेशबुवा रामदासी यांच्या हस्ते प्रकाशन !
सातारा, ८ जून (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आहे. या स्मरणिकेचे प्रकाशन श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समर्थभक्त पू. योगेशबुवा रामदासी यांच्या हस्ते समर्थसदन येथे भावपूर्ण वातावरणात पार पडले. सनातन संस्थेच्या सौ. विद्या कदम, डॉ. सुनील महाडिक, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, सौ. भक्ती डाफळे, रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक हे या वेळी उपस्थित होते.
सनातन संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वाढत जावो ! – पू. योगेशबुवा रामदासी
या वेळी सनातनच्या कार्याला आशीर्वाद देताना समर्थभक्त पू. योगेशबुवा रामदासी म्हणाले की, राष्ट्र आणि धर्म जागृतीचे सनातन संस्थेचे कार्य मोठे आहे. हिंदूंमध्ये स्वधर्म, स्वभाषा, स्वराष्ट्राभिमान रुजवण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. अध्यात्मातील धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंची झालेली दयनीय स्थिती पालटण्याचे कार्य सनातनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात चालू आहे. ‘सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य असेच उत्तरोत्तर वाढत जावो’, अशी श्रीसमर्थ चरणी प्रार्थना करतो. सनातनच्या कार्याला आमचे शुभाशीर्वाद आहेत.