धार्मिक भावना दुखावतील, असे लिखाण करू नका !
नाशिक पोलिसांच्या नागरिकांना सूचना !
नाशिक – कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असे लिखाण सामाजिक माध्यमांनी प्रसारित करू नये, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. यासह पोलिसांकडून नाशिककरांना दक्षतेच्या सूचना आणि कारवाईची चेतावणी देण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी ‘सोशल मीडिया पेट्रोलिंग’ ही व्यवस्थाही चालू केली आहे.