शिखांसाठी मोदी यांच्याएवढे कार्य अन्य कोणत्याच पंतप्रधानाने केले नाही ! – जस्सी सिंह, अध्यक्ष, ‘सिख ऑफ अमेरिका’
‘सिख ऑफ अमेरिका’ संघटनेचे अध्यक्ष जस्सी सिंह यांचे वक्तव्य
वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जूनपासून अमेरिकेच्या ३ दिवसीय दौर्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘सिख ऑफ अमेरिका’ या संघटनेचे अध्यक्ष जस्सी सिंह यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेमध्ये रहाणार्या शीख समुदायाच्या सर्व मागण्या पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केल्या आहेत. शिखांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटून त्यांना धन्यवाद देणार आहे. पंतप्रधान मोदी शिखांच्या समस्या जाणतात आणि ते मनापासून शिखांवर प्रेम करतात.
PM Modi instrumental in fulfilling demands of Sikhs, says Sikh American leader #PMModi #SikhAmericancommunity #PMModiUSVisit https://t.co/870K8HOAuL
— Republic (@republic) June 8, 2023
सिंह यांच्या मते पंतप्रधान मोदींनी या मागण्या केल्या पूर्ण !
- २६ डिसेंबरला ‘वीर बाल दिवस’ साजरा करणे
- गुरुनानक देव यांचा ५५० वा प्रकाश पर्व साजरा करणे
- १९८४ च्या दंगलींचे अन्वेषण करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची नियुक्ती करणे
- काळ्या सूचीत घातलेल्या विदेशातील अनेक शिखांची नावे त्यातून काढणे