इंदिरा गांधींच्या हत्येचा कॅनडातील खलिस्तान्यांकडून आनंदोत्सव
ओटावा (कॅनडा) – कॅनडात खलिस्तान्यांचे आणखी एक लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. कॅनडातील ब्रॅम्प्टन परिसरात देखावा फेरी काढण्यात आली. यामध्ये भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा प्रसंगही मांडण्यात आला होता. या देखाव्यामध्ये या प्रसंगाचे वर्णन ‘सूड’ म्हणून केले गेले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या प्रकरणी कॅनडा सरकारचा निषेध नोंदवत ‘कॅनडामध्ये फुटीरतावादी आणि कट्टरतावादी शक्तींना संरक्षण दिले जात आहे’, असे म्हटले.
सौजन्य टाईम्स नाऊ
अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून आतंकवाद्यांना हटवण्यासाठी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ चालवले होते. या कारवाईच्या निषेधार्थ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची वर्ष १९८४ मध्ये त्यांच्याच शीख असलेल्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. कॅनडातील खलिस्तानी त्या घटनेला सूडाचे नाव देऊन आनंदोत्सव साजरा करतांना दिसत आहेत.
(म्हणे) ‘द्वेष आणि द्वेषाच्या गौरवाला कॅनडामध्ये स्थान नाही !’ – कॅनडाचे भारतातील उच्चायुक्तकॅनडाचे असे वक्तव्य म्हणजे ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ याच्या पलीकडे काही नाही ! भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांनी खलिस्तान्यांच्या या कृतीवर नापसंती व्यक्त केली आहे. कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांनी ट्वीट करत म्हटले की, द्वेष आणि द्वेषाच्या गौरवाला कॅनडामध्ये स्थान नाही. अशा घटनांचा आम्ही निषेध करत आहोत. |
संपादकीय भूमिकाकॅनडातील खलिस्तान्यांच्या कृत्यांवर संपूर्ण आळा घालण्यासाठी भारताने कॅनडा सरकारला दबाव आणणे आवश्यक आहे ! |