कर्नाटकात गोहत्या आणि हिजाब विरोधी कायदे मागे घेतले जातील ! – काँग्रेसचे मंत्री प्रियांक खड्गे
कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री प्रियांक खड्गे यांचा फतवा !
बेंगळुरू (कर्नाटक) – आधीच्या राज्य सरकारने आणलेला गोहत्याविरोधी कायदा कर्नाटकला आर्थिक हानी पोचवत आहे. केवळ गोहत्याविरोधीच नाही, तर हिजाबविरोधी कायदाही मागे घेतला जाऊ शकतो, असे वक्तव्य कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक खडगे यांनी केले. त्यांच्यामते हिजाबबंदीमुळे सामाजिक विकासावर परिणाम होत आहे.
Karnataka govt may withdraw circular banning hijab, warns of RSS ban https://t.co/56xQwZBXt5
— The Times Of India (@timesofindia) May 25, 2023
खड्गे पुढे म्हणाले की, कांग्रेस राजकारण नाही, तर अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करते. (गोहत्या करून आर्थिक लाभ मिळवू पहाणारे काँग्रेसवाले. गोधनाचे संवर्धन केल्यास कित्येक पटीने आर्थिक लाभ होतो, हे सिद्ध झाले आहे; मात्र मुसलमानांना खूश करण्यासाठी काँग्रेस गोहत्येला प्रोत्साहनच देणार, हे लक्षात घ्या ! – संपादक) राज्याची वित्तीय तूट अल्प करण्यासाठी पुढील २ वर्षांत हे दोन्ही कायदे मागे घेतले जाऊ शकतात. (वित्तीय तुटीचे अल्प करण्यासाठी अन्य बरेच मार्ग आहेत; मात्र मुसलमानांच्या लांगूलचालनाविना आणखी काहीही न दिसणार्या काँग्रेसवाल्यांकडून आणखी काय अपेक्षा करणार ? – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदुद्रोही काँग्रेसला मत दिल्याचे फळ आता तेथील हिंदूंनी भोगणे क्रमप्राप्त आहे ! |