फ्रान्समध्ये शरणार्थी धर्मांध मुसलमानाकडून मुलांवर चाकूने आक्रमण !
६ मुले घायाळ
एल्प्स (फ्रान्स) – येथील एनेसी तळ्याजवळील पार्कमध्ये खेळत असलेल्या लहान मुलांवर धर्मांध मुसलमानाने चाकूने केलेल्या आक्रमणात ६ लहान मुले गंभीररित्या घायाळ झाली आहेत. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपीच्या पायावर गोळी मारून त्याला घटनास्थळीच अटक केली. आरोपी सीरियातून फ्रान्समध्ये आलेला शरणार्थी असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याचे नाव घोषित केलेले नाही. आरोपीचे म्हणणे आहे की, तो शरणार्थीचा दर्जा मागत होता आणि तो मिळण्यासाठी त्याने मुलांवर आक्रमण केले. (स्वतःची मागणी मान्य करण्यासाठी इतरांवर आक्रमण करण्याची धर्मांधांची पाशवी मानसिकता जाणा ! – संपादक) या आक्रमणाच्या घटनेची फ्रान्सच्या संसदेत निषेध करण्यात आला.
UPDATE: Four young children and an adult were injured in a knife attack in the French town of Annecy. Police earlier said eight children had been hurt https://t.co/MhSyKQgHkk pic.twitter.com/CCTQDGqijY
— Reuters (@Reuters) June 8, 2023
संपादकीय भूमिकायुरोपमध्ये शरणार्थी मुसलमानांमुळे सामाजिक स्थिती अत्यंत वाईट होत चालल्याचे अशा घटनांतून समोर येत आहे. पूर्वी भारतातील हिंदूंवर अत्याचार करणार्या धर्मांध मुसलमानांविषयी मौन बाळगणारे युरोपीय देश आता स्वतःच यात भरडले जात आहेत, याला नियतीने शिकवलेला धडाच म्हणावा लागेल ! |