(म्हणे) ‘मी औरंगजेबासमवेत आहे !’ – आमदार अबू आझमी
आमदार अबू आझमी यांच्याकडून क्रूरकर्मा औरंगजेबाचे उदात्तीकरण !
मुंबई – मी ‘रहमतुल्लाह अलैह’ (इस्लाममध्ये अल्लाहला प्रिय असलेल्या व्यक्तीला ‘रहमतुल्लाह अलैह’ असे संबोधले जाते) औरंगजेबसमवेत आहे. त्यांचा इतिहास पाहिला, तर आपल्याला लक्षात येई ते एक धर्मनिरपेक्ष बादशाह होते. (हिंदूंवर क्रूर अत्याचार करणार धर्मनिरपेक्ष कसा ? हिंदूंनी याचा कडाडून निषेध केला पाहिजे ! खोटा इतिहास पसरवत असल्याविषयी अबू आझमी यांना शिक्षा का होऊ नये ? – संपादक) ‘त्यांनी अफगाणिस्तान ते ब्रह्मदेशपर्यंत भारतवर्ष निर्माण केले’, असे क्रूरकर्मा औरंगजेब याचे समर्थन करणारे ट्वीट समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले. (खोटारडे अबू आझमी ! भारतवर्ष औरंगजेबाने निर्माण केले नाही, तर ते उद्ध्वस्त केले. भारतवर्ष प्राचीन काळापासून अस्तित्वात होतेच ! – संपादक)
सौजन्य इंडिया न्यूज
महाराष्ट्रात काही ठिकाणी धर्मांध मुसलमानांकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात येत आहे. याच्या समर्थनार्थ अबू आझमी यांनीही ट्वीट केले आहे. अबू आझमी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे, ‘इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, जेथे हिंदु आणि मुसलमान शासकांनी सत्ता चालवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले. सध्या मात्र राजकीय लाभासाठी त्याला धार्मिक रंग देऊन द्वेष पसरवला जात आहे. यामध्ये मोदीसमर्थक प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे.’
अनेक मुसलमानांनी अबू आझमी यांच्या ‘ट्वीट’चे समर्थन, तर राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिका
|