पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे मानांकन घसरले !
पुणे – देशातील सर्वोकृष्ट शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे स्थान खाली घसरले आहे. सर्वच विद्यापीठ शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत ३५ व्या स्थानावर घसरले आहे, तर विद्यापिठाच्या गटामध्ये १९ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी सर्वच विद्यापीठ शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत २५ व्या स्थानावर होते. वर्ष २०२० मध्ये विद्यापिठाच्या गटात ९ व्या क्रमांकावर होते. परंतु महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापीठ अजूनही प्रथम क्रमांकावर आहे.