सिकंदर एक सिकंदर आहे, तर चंद्रगुप्त हा सवाई सिकंदर आहे !
वीर सावरकर उवाच
सिकंदराला त्याच्या वडिलांनी आधीच मिळवलेल्या प्रबळ राज्याचे आणि सैन्याचे उदंड भांडवल लाभले होते. त्या आधारावर स्वतःच्या पराक्रमाने त्याने ग्रीकांचे साम्राज्य उभारले. चंद्रगुप्ताला असा कोणताही आधार नव्हता. त्याच्या पदरी एकही सैनिक नव्हता. त्याच्या वडिलांनी त्याला राज्याबाहेर हुसकून दिले होते. एकच पुरुष तेवढा त्याच्या पाठीशी उभा होता तो म्हणजे आर्य चाणक्य ! अशा स्थितीत शून्यापासून आरंभ करून चंद्रगुप्ताने स्वतःचे बलाढ्य सैन्य उभारले. स्वतः सिकंदराच्या आणि त्याचा सेनापती सेल्युकसच्या भारतावर झालेल्या स्वार्यांचा बोजवारा उडवून दिला अन् सिकंदराच्या साम्राज्याहून महत्तर (श्रेष्ठ) असलेल्या भारतीय साम्राज्याची उभारणी केली !
(साभार : ‘सहा सोनेरी पाने’, सोनेरी पान पहिले : सवाई सिकंदर)