पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्याच्या मागणीसाठी १०० हून अधिक ‘होर्डिंग्ज’ !
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाचे औचित्य साधत पिंपरी-चिंचवड शहराचे ‘जिजाऊनगर’ नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘भक्ती शक्ती प्रतिष्ठान’च्या महेश बारणे यांनी ही मागणी केली आहे. नामकरणाच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये १०० हून अधिक ‘होर्डिंग्ज’ लावण्यात आले आहेत. ‘इथल्या मातीत उमटली आहेत पाऊले त्यांची, इथल्या वार्याने झेलले आहेत श्वास नि:श्वास त्यांचे, इथल्या पाण्यात मिसळला आहे घाम त्यांच्या परिश्रमाचा, आता होऊ दे या आसमंतात जयजयकार त्या नावाचा, आता पिंपरी-चिंचवडचे नामकरण ‘जिजाऊनगर’ करूया’, असे ‘होर्डिंग’वर लिहिले आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी ‘लाईक’ करा आणि ‘मिस कॉल’ द्या अशी मोहीम राबवण्यात आली आहे.