(म्हणे) ‘शासनाला महाराष्ट्रात दंगली हव्या आहेत !’ – आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – मी ३ मासांपूर्वी बोललो होतो. महाराष्ट्रात वारंवार दंगली घडवल्या जातील. जे चांगले चालले आहे, त्यात वातावरण बिघडवण्याचे काम केले जाईल. शासनाला काहीही करून दंगली हव्या आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी व्यक्त केली. याविषयी आव्हाड यांनी ट्वीटही केले आहे.
महाराष्ट्रात जातीय धार्मिक विद्वेष वाढीला लागणार हे मी दोन महिन्या पूर्वी बोललो होतो…. पराभवा पासून वाचवन्या साठीचा मार्ग …..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 7, 2023
या वेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचे वातावरण इतके खराब आहे की, सद्यस्थितीत निवडणूक झाली, तर महाविकास आघाडीला २०० जागा मिळतील. त्यामुळे निवडणूक होईल, तेव्हा होईल; पण तोपर्यंत वातावरण बिघडवून टाका, असा प्रयत्न सरकार करत आहे.’’
संपादकीय भूमिकाऔरंगजेबाचे समर्थन करणार्यांविषयी काही न बोलता सरकारवर गरळओक करणारे मुसलमानधार्जिणे आव्हाड ! |