(म्हणे) ‘केरळमध्ये चर्चवर आक्रमण करणार्यांमागे विशिष्ट विचारधारा !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई – केरळमध्ये चर्चवर आक्रमणे झाली. ख्रिस्ती समुदाय शांत स्वभावाचा असतो. समजा एखाद्याची चूक झाली असेल, तर चर्चवर आक्रमण करण्याचे कारण काय ? या आक्रमणांमागे विशिष्ट विचारधारा दिसून येते, अशा प्रकारे नाव न घेता शरद पवार यांनी केरळ येथील चर्चवरील आक्रमणावरून हिंदूंना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ७ जून या दिवशी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी वरील वक्तव्य केले.
VIDEO | जाणीवपूर्वक भेदभाव सुरू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत शरद पवार नेमकं काय म्हणाले?https://t.co/s03mDbfwoe#sharadpawar #ahmadnagar
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2023
या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘चर्चवर आक्रमण करणारी विचारधारा देशहिताची नाही. मुसलमान आणि ख्रिस्ती समाज यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. आदिवासी आणि दलित समाज या घटकांना जपणे हेही सरकारचे काम आहे.’’ (लव्ह जिहाद, लँड जिहाद, दंगली, हिंदूंच्या हत्या आदींमुळे हिंदूंची लोकसंख्या न्यून होऊन मुसलमानांची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे हिंदूंनाच संरक्षण देण्याची आवश्यकता आहे, हे बुद्धीमान पवार यांना लक्षात येत नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल ! – संपादक)
(म्हणे) ‘लव्ह जिहादसारख्या फाजील प्रश्नांना महत्त्व दिले जात आहे !’लव्ह जिहादसारख्या प्रश्नांना फाजील महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे कारण नसतांना समाजासमाजांत तेढ वाढत आहे. या सगळ्या गोष्टींना प्रसारमाध्यमांनीही अधिक प्रसिद्धी देऊ नये. लव्ह जिहादपेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न देशात आणि राज्यात आहेत. असे असतांना उगाच अन्य प्रश्न समोर आणले जात आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. देशातील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांविषयी पत्रकारांनी विचारले असता पवार यांनी वरील वक्तव्य केले. (खोटे बोलून ‘हिंदु आतंकवाद’ ही संकल्पना पसरवून हिंदूंना आंतकवादी ठरवू पहाणारे शरद पवार धर्मांध मुसलमानांच्या आंतकवादी कारवाया उघडपणे चालू असूनही त्यांना सहिष्णु ठरवू पहात आहेत ! यातून शरद पवार यांचा हिंदूद्वेष किती पराकोटीचा आहे, हेच दिसून येते ! – संपादक) |
संपादकीय भूमिका
|