बीबीसीने दिली ४० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची स्वीकृती !
नवी देहली – ‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ अर्थात् बीबीसी या ब्रिटीश प्रसारमाध्यमाने भारतात ४० कोटी रुपयांचा कर चुकवल्याची स्वीकृती दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानुसार ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’च्या २ अधिकार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर याविषयी माहिती दिली. ‘बीबीसीने आमच्या कार्यालयाला इमेल करून कर चुकवल्याची स्वीकृती दिली’, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी ‘या इमेलला कोणताही कायदेशीर आधार नाही. ‘बीबीसी कर चुकवण्याविषयी गंभीर असेल, तर त्यांनी सुधारित कर भरावा’, असेही या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
BBC ने माना, भारत में चुकाया कम टैक्स, आयकर विभाग ने मारे थे छापे#IncomeTax https://t.co/LIk6QF0MvT
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) June 6, 2023
१. अधिकार्याने सांगितले की, आपल्या देशात कायदा सर्वांसाठी समान आहे. एखाद्या प्रसारमाध्यम आस्थापनाला किंवा विदेशी आस्थापनाला विशेष वागणूक दिली जात नाही. त्यामुळे बीबीसी जोपर्यंत कायदेशीर मार्गाने हे प्रकरण सोडवत नाही, तोपर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई चालूच रहाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२. काही आठवड्यांपूर्वी बीबीसीच्या नवी देहली आणि मुंबई येथील कार्यालयांवर आयकर विभागाने धाड घातली होती. त्या वेळी बीबीसीने ही धाड गुजरात दंगलीवरून मोदी यांना लक्ष्य करणारा माहितीपट प्रदर्शित केल्यामुळे घालण्यात आल्याचा दावा केला होता; मात्र आता कर चुकवेगिरीची स्वीकृती दिल्याने तो कांगावा होता, हे स्पष्ट झाले आहे.
३. आयकर विभागाने यावर्षी फेब्रुवारीमध्ये बीबीसीचे कर सर्वेक्षण केले होते. ज्यामध्ये वर्ष २०१६ पासून करचोरी आढळून आली होती. बीबीसीने करचोरी केल्याचे आधी नाकारले होते आणि आता ते मान्य केले. आता बीबीसीने थकित कर भरण्यासाठी अर्ज केला आहे; मात्र पैसे भरलेले नाहीत.
संपादकीय भूमिकाकर चुकवेगिरी केल्याचे आधी नाकारून वर छळ करण्यात येत असल्याचा कांगावा करणार्या बीबीसीवर आता नियमानुसार कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तरच अशा ब्रिटीश आस्थापनाला वचक बसेल ! |