पुणे येथील ऐतिहासिक पर्वती टेकडीवर अवैध मजार !
(मजार म्हणजे मुसलमानाचे थडगे)
पुणे – येथे ऐतिहासिक ओळख असलेल्या पर्वती टेकडीवर मुसलमानांनी अवैध मजार बांधल्याचे समोर आले आहे. या टेकडीवर पुणेकरांची पुष्कळ वर्दळ असते. (राजरोसपणे होत असलेले इस्लामी अतिक्रमण कुणालाच कसे दिसले नाही ? निद्रीस्त हिंदूंनी आतातरी जागरूक आणि संघटित होऊन धर्मांधांचे हे ‘लँड जिहाद’चे षड्यंत्र मोडून काढावे ! – संपादक) अशा प्रकारे ‘या टेकडीवर मजार बांधून मुसलमान येथील जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षातही तेथे आता मुसलमान नमाजपठण करण्यासाठी गर्दी करत आहेत. काही जागरूक नागरिकांनी हा प्रकार समाजमाध्यमांद्वारे उघडकीस आणला.
सौजन्य टीव्ही 9 मराठी
१. टेकडीवर असलेल्या मोकळ्या जागेतच ही मजार बांधण्यात आली आहे. मजारीभोवती ओट्यासारखे बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली.
२. आमदार मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून पोलिसांत तक्रार करण्याची सूचना केली.
३. भाजपचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनीही यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याच विषयासंदर्भात ६ जून या दिवशी दोन विभागांच्या अधिकार्यांना आणि पुणे महापालिकेच्या आयुक्तांनाही निवेदन देण्यात आले आहे.
४. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे यांनी सांगितले की, आम्हाला याविषयी तक्रार मिळाली आहे. आम्ही त्याची पडताळणी करत आहोत. ही मजार जुनी असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. (‘मजार जुनी आहे’ म्हणजे ती वैध आहे, असे पोलीस निरीक्षकांना म्हणायचे आहे का ? – संपादक) सर्व संबंधित विभागांच्या नोंदींनुसार वस्तूस्थिती पडताळून पाहिली जाईल. लगेच कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे योग्य नाही.
पर्वती टेकडीची वैशिष्ट्येपर्वती टेकडी आणि त्यावरील मंदिरे, तसेच तेथे असलेले पेशव्यांचे वस्तूसंग्रहालय ही पुणे शहरातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान नानासाहेब पेशवे यांनी पर्वती टेकडीवर श्री देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले. यासह तेथे कार्तिकेय, विष्णु, विठ्ठल-रुक्मिणी इत्यादी देवतांची मंदिरेही आहेत. |
संपादकीय भूमिका
|