सुवर्णमंदिरात खलिस्तान समर्थकांकडून देशविरोधी घोषणा !
खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रक झळकावले !
अमृतसर (पंजाब) – वर्ष १९८४ मध्ये राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ३९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील सुवर्णमंदिरात खलिस्तानच्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी जमलेल्या लोकांकडून खलिस्तानी आतंकवादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले याचे भित्तीपत्रकदेखील झळकवण्यात आले. सैन्याच्या कारवाईत भिंद्रनवाले ठार झाला होता. सुवर्णमंदिरात अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले असून या घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष आहे.
#WATCH Amritsar: ‘Khalistan Zindabad’ slogans raised in Golden Temple on Operation Bluestar anniversary pic.twitter.com/dKnSgQQBbA
— ANI (@ANI) June 6, 2017
घोषणाबाजीच्या वेळी श्री अकाल तख्तचे जत्थेदार (प्रमुख) ज्ञानी हरप्रीत सिंह यांनी शीख समुदायाला संबोधित करतांना सांगितले की, सध्या आपला समाज आणि धार्मिक संघटना दुभंगल्या आहेत, त्यांनी श्री अकाल तख्तच्या नेतृत्वाखाली एकत्र करणे, ही काळाची आवश्यकता आहे.
संपादकीय भूमिकाखलिस्तान्यांची कीड अद्याप नष्ट झालेली नाही. ती नष्ट करण्यासाठी आताच कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे ! |