मुसलमान दुकानदारांना १५ जूनपूर्वी दुकाने रिकामी करून निघून जाण्याची चेतावणी !
उत्तरकाशी (उत्तराखंड) येथील ‘लव्ह जिहाद’च्या घटनेमुळे संतप्त हिंदूंचा उद्रेक !
उत्तरकाशी (उत्तराखंड) – येथे एका मुसलमान तरुणाने एका अल्पवयीन हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. ‘मुसलमान दुकानदारांनी १५ जूनपर्यंत त्यांची दुकाने रिकामी करून निघून जावे’ अशी चेतावणी देणारी भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. यामुळे मुसलमान दुकानदार शहर सोडून पळून केले आहेत, तर काहींना दुकाने उघडण्यास भीती वाटत आहे. उत्तरकाशीतील मुख्य पुरोला बाजारातील दुकानांवर ही भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. भित्तीपत्रकांविषयी पोलिसांनी सांगितले की, ही भित्तीपत्रके हटवली असून ती चिकटवणार्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. (ज्या तत्परतेने पोलिसांनी भित्तीपत्रके हटवली, त्याच तत्परतेने लव्ह जिहाद घडणार नाही, यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)
After ‘elopement bid’, posters asking Muslim traders to shut down shops appear in #Uttarakhand’s #Uttarkashi @itsmeavaneesh reports:https://t.co/9rjLxzwosk
— The Indian Express (@IndianExpress) June 6, 2023
एका अल्पवयीन हिंदु मुलीला पळवून नेल्याच्या आरोपाखाली स्थानिक दुकानदार उबेद खान आणि त्याचा साथीदार जितेंद्र सैनी यांना २७ मे या दिवशी अटक करण्यात आली होती. हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. या घटनेनंतर काही मुसलमानांच्या घरावर आक्रमणेही करण्यात आली होती.
संपादकीय भूमिका
|