कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी !
कोल्हापूर – विशाळगडावर पशू-पक्षी यांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी करावी, अशी मागणी गेली काही वर्षे विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, विविध गडकोट संघटना, हिंदुत्वनिष्ठ संघटना करत होत्या. अखेरीस आता पुरातत्व विभागाला जाग आली असून विभागाने कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर पशूहत्या करण्यास पुरातत्व विभागाची बंदी असल्याचा आदेश काढला आहे. याचसमवेत अमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी यांनी याची कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
अखेर प्रतीक्षा संपली, पाठपुराव्यास यश
आता विशाळगड घेणार मुक्त श्वासपशुहत्या बंदी आजपासून लागू!
पशु पक्षी हत्या करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार!जय शिवराय🚩#विशाळगड #vishalgad #vishwhinduparishad #विश्वहिन्दूपरिषद pic.twitter.com/OqPSCWCA0m
— Kundan Patil (@KundanPatil_1) June 2, 2023
गेली अनेक वर्षे विशाळगडावर पशू-पक्षी यांची हत्या करून त्यांचे मांस शिजवण्यात येते. यामुळे त्यांची पिसे, तसेच अन्य मांस, रक्तही गडावर अनेक वेळा पसरते. यामुळे गडाचे पावित्र्य भंग होते. त्यामुळे गडावर पशूहत्या बंदी व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती; मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या पुरातत्व विभागाकडून ती कृती होत नव्हती. अखेरीस जूनमध्ये पुरातत्व विभागाने हा आदेश काढला आहे.