शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार !
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यविभागाद्वारे भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्यात येणार आहे. ६ जून या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे समारंभपूर्वक या तिकिटाचे अनावरण करण्यात येणार आहे.
350 व्या #शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन विशेष टपाल तिकीट काढणार
➡️सांस्कृतिक कार्य मंत्री @SMungantiwar यांचा पुढाकार
➡️राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी अनावरण@MahaDGIPR @InfoVidarbha @collectorchanda
Info⬇️https://t.co/7q1CXdJoob pic.twitter.com/jWUQC9JRlv— DISTRICT INFORMATION OFFICE, CHANDRAPUR (@InfoChandrapur) June 5, 2023
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अन्य मंत्री उपस्थित रहाणार आहेत. याविषयी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारे अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. महाराजांचा विचार जगभरात जनाजनांत आणि मनामनांत पोचवण्याचा दृढ निश्चय राज्यशासनाने केला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराजांवरील पोस्ट तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आला आहे.’’