मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – मंत्रीमंडळाविषयी अमित शहा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी अमित शहा सकारात्मक आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्ताराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.
४ जून या दिवशी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देहली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर ५ जून या दिवशी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘येत्या काळात लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवेल. महाविकास आघाडीच्या काळात अपूर्ण राहिलेली विकासकामे महायुती पूर्ण करत आहे. विविध विकास प्रकल्प आम्ही मार्गी लावत आहोत.’’