हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांचे वास्तव जाणा !
‘सध्या ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजत आहे; परंतु दुसरीकडे त्याला विरोधही होत आहे. एरव्ही हिंदी चित्रपट अभिनेते सलमान खान, शाहरुख खान, सैफ अली खान, आमीर खान ही ‘खान’ मंडळी हिंदु धर्माच्या संदर्भात कोणताही चित्रपट आला आणि कुणी त्याला विरोध केला, तर हे सर्वजणही त्या वादात उडी घेतात; मात्र ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाविषयी ते काहीच का बोलत नाहीत ? वास्तवाशी संबंधित आणि ज्वलंत विषय असल्यामुळे त्यांची दातखीळ बसली का ? हो ना ! कारण सत्य जगासमोर येत असल्याचे हे अभिनेतेसुद्धा अनुभवत असतील. या सगळ्या अभिनेत्यांना ठाऊक आहे की, आपण जर याविषयी काही बोललो, तर आपले पितळ उघडे पडून आपल्यालाही भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकेल.
आमीर खान यांनी म्हटले होते, ‘‘भारतात असहिष्णुता आहे.’’ त्यांनी प्रथम ‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहावा आणि मग भारतात कुणामुळे असहिष्णुता निर्माण झाली आहे, हे सांगावे !
हिंदूंनी डोळ्यांवर लावलेली झापडे काढावीत. आपण या अभिनेत्यांना आदर्श मानून त्यांचा उदोउदो करतो. प्रत्यक्षात त्यांची स्थिती काय आहे, हे जाणून त्यांना किती पाठिंबा द्यायचा ? त्यांना किती डोक्यावर घ्यायचे ? हे वेळीच ठरवायला हवे.’
– सुश्री (कु.) नीलिमा कुलकर्णी (वय ४० वर्षे), पनवेल. (२२.५.२०२३)