‘ऑनलाईन’ खेळाच्या माध्यमातून हिंदु मुलांचे धर्मांतर करण्यासाठी धर्मांधांची टोळी सक्रीय !
उत्तरप्रदेशमधील जैन अल्पवयीन मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणी मोठा खुलासा !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – ऑनलाईन खेळाच्या माध्यमातून येथील जैन कुटुंबातील अल्पवयीन मुलाच्या करण्यात आलेल्या धर्मांतराच्या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हा मुलगा ज्या मशिदीत ५ वेळा नमाजपठणासाठी जात होता, त्या मशिदीच्या समितीचा माजी सदस्य अब्दुल रहमान याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. मुलांचा ‘ऑनलाईन गेमिंग (खेळाचे) अॅप’द्वारे बुद्धीभेद करणारी टोळी सक्रीय असल्याचे समोर आले आहे. या टोळीतील धर्मांध ऑनलाईन खेळ जिंकण्यासाठी मुसलमानेतर मुलांकडून कुराणातील आयते पाठ करून घेत असे. मग त्यांचा बुद्धीभेद करून त्यांचे धर्मांतर करत असे.
Ghaziabad: Brainwashed through online game, 17-year-old Jain boy started visiting mosque to offer namaz, was influenced by Zakir Naik, father files complainthttps://t.co/lTGLIkvadY
— OpIndia.com (@OpIndia_com) June 1, 2023
आरोपीच्या भ्रमणध्वनीमधून धर्मांतराशी संबंधित पुरावेही मिळाले आहेत.
पीडित मुलाच्या वडिलांनी गाझियाबादमधील कविनगर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पीडित मुलगा व्यायामशाळेत (‘जिम’मध्ये) जाण्याच्या बहाण्याने प्रतिदिन ५ वेळा घराबाहेर पडत होता. वडिलांना हे संशयास्पद वाटल्याने त्यांनी मुलाचा पाठलाग केला असता तो प्रत्येक वेळी मशिदीत जाऊन नमाजपठण करत असल्याचे त्यांना आढळून आले. वडिलांनी मुलाचा भ्रमणभाष आणि लॅपटॉप पडताळला असता त्यांना इस्लामशी संबंधित बरेच साहित्य आढळून आले होते. आपला मुलगा अल्पवयीन असून त्याचा बुद्धीभेद करण्यात आला आहे, असे पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले होते.
#FPIndia #FPNews
How Online gaming is being used for forceful conversions, trafficking of vulnerable minors in India
Read Report: https://t.co/hxiS5ZH9CU— Firstpost (@firstpost) June 5, 2023
जैन कुटुंबातील अल्पवयीन मुलाने मुंबईतील बद्दो नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला होता. त्याचे नाव शाहनवाज मकसूद असे आहे. तो महाराष्ट्रातील ठाणे येथील रहिवासी आहे. शाहनवाजला पकडण्यासाठी गाझियाबाद पोलिसांची पथक महाराष्ट्रात पोचले आहे.
Ghaziabad: Muslim man lures Hindu, Jain boys to convert to Islam in online game ‘Fortnite’ after making fake Hindu IDs, one Maulvi arrested too. Full detailshttps://t.co/iTH97coeUL
— OpIndia.com (@OpIndia_com) June 5, 2023
पोलीस चौकशी समोर आलेले हिंदूंच्या धर्मांतराचे तीन टप्पे –या प्रकरणी पोलिसांनी तीन पीडित मुलांची चौकशी केली असता धर्मांतराचे तीन टप्पे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. १. पहिल्या टप्प्यात, एक टोळी सक्रीय होती जी ‘ऑनलाईन गेमिंग अॅप’च्या माध्यमातून ऑनलाईन खेळ सिद्ध करायची. काही मुले खेळात हरली, तर त्यांना कुराणातील आयते पाठ करायला सांगायचे आणि मग खेळात जिंकवून त्यांना कुराणावर विश्वास ठेवायला भाग पाडायचे. २. दुसर्या टप्प्यात मुसलमान मुले हिंदु नावाचा ‘युजर आयडी’ (वापरकर्त्याचा संगणकीय पत्ता) सिद्ध करून हिंदु मुलांशी गप्पा मारायचे. त्यांना इस्लामी चालीरिती अंगीकारायला सांगायचे. ३. तिसर्या टप्प्यात इस्लामी प्रवक्ता झाकीर नाईक याची विखारी भाषणे हिंदु मुलांना ऐकवली जात असे आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात असे. |
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक संस्थांनी हिंदूंना धर्मशिक्षण दिल्यास त्यांना स्वधर्माचे महत्त्व कळून त्यांच्यात स्वधर्माविषयी अभिमान वाढेल आणि मग ते अशा धर्मांतराच्या षड्यंत्राला कदापि बळी पडणार नाहीत ! |