ओडिशातील रेल्वे अपघाताच्या घटनेला धार्मिक रंग देऊ नका ! – ओडिशा पोलिसांचे आवाहन
भुवनेश्वर (ओडिशा) – बालासोर येथील भीषण अपघाताला काही समाजकंटकांकडून धार्मिक रंग दिला जात आहे, असा आरोप ओडिशा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी एका निवेदनाद्वारे जनतेला आवाहन केले आहे की, असे करणे अत्यंत दुर्दैवी आहे. सामाजिक माध्यमांतून अपघाताच्या संदर्भातील वृत्तांना धार्मिक रंग देऊ नका.
ओडिशा रेल्वे अपघाताला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न; पोलिसांनी दिली सक्त ताकीद; म्हणाले, “कठोर कारवाई होईल!”https://t.co/QYOxrMQ81r < येथे वाचा सविस्तर वृत्त#Odisha #Police #SocialMedia #Posts #CommunalColor #TrainAccident pic.twitter.com/901sA4ODnd
— LoksattaLive (@LoksattaLive) June 5, 2023
आमची सगळ्यांना विनंती आहे की, अशा प्रकारच्या पोस्ट प्रसारित करू नका. या माध्यमातून दोन धर्मियांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.