(म्हणे) ‘वैज्ञानिक शोध पुराणांमध्येच लिहून ठेवल्याचे म्हणणार्यांशी कसा संवाद साधणार ?’ – हिंदुद्वेषी अभिनेते नसीरुद्दीन शाह
हिंदुद्वेषी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांची ‘इस्रो’च्या प्रमुखांवर टीका !
मुंबई – इस्रोच्या प्रमुख बहुतेक एक महिला आहेत. त्यांनी मध्यंतरी असा दावा केला की, हे सगळे वैज्ञानिक शोध आपल्या पुराणांमध्येच आधीच कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहेत. पाश्चिमात्य देशांनी या गोष्टीचा लाभ घेत सगळे श्रेय घेतले आहे. आता असे विचार असलेल्या व्यक्तीशी तुम्ही नेमका कसा संवाद साधणार किंवा वाद घालणार ?, असे विधान हिंदुद्वेषी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी येथे केले. ते एका मुलाखतीत बोलत होते. नसीरुद्दीन शाह सध्या ‘ताज : डिव्हाइड बाय ब्लड’ या ‘वेब सीरिज’मध्ये मोगल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. यासंदर्भात त्यांची मुलाखत घेण्यात आली होती.
Naseeruddin Shah: ISRO चीफ पर नसीरुद्दीन शाह ने लगाए दुष्प्रचार के आरोप, बोले- अंधविश्वास की ओर बढ़ रहा भारत#NaseeruddinShah #ISRO #ISROChief #TajDividedByBloodhttps://t.co/RHHL0IptAu
— Amar Ujala (@AmarUjalaNews) June 4, 2023
शाह पुढे म्हणाले, ‘‘विज्ञानाऐवजी आपण पुन्हा मागे अंधश्रद्धेकडे वाटचाल करत आहोत. ‘अमूक गोष्ट केली, तर कर्करोग बरा होईल’, ‘अमूक गोष्ट केली, तर विमान उडेल’, अशा कित्येक भ्रामक कल्पनांच्या आपण अधीन जात आहोत. चार्ल्स डार्विनला पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आले आहे. (जे असत्य आहे, ते कधीतरी समोर येतेच आणि मग समाज ते नाकारतो, हेच डार्विनच्या सिद्धांताविषयी झाले आहे. याचाही अभ्यास नसणारे नसीरुद्दीन शाह हिंदूंच्या पुराणाविषयी बोलतात, हे हास्यास्पदच होय ! – संपादक) काही दिवसांनी ही गोष्ट आईनस्टाईनच्या संदर्भातही घडेल. त्यानंतर हे लोक मुलांना काय शिकवणार आहेत ?’’ (श्रद्धा आणि अंधश्रद्धा म्हणजे काय ? हे तरी नसीरुद्दीन शाह यांना ठाऊक आहे का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|