अमरावती येथे पंढरपूर वारी पालखी दर्शन आणि पूजन सोहळ्यात सनातनच्या साधकांचा सहभाग !
श्री शंकरानुचल धर्मराज श्री नारायण गुरु महाराज माऊलीकर यांनी आरंभलेल्या पायी वारीला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सोहळा !
अमरावती, ४ जून ( वार्ता.) – श्री शंकरानुचल धर्मराज श्री नारायण गुरु महाराज माऊलीकर यांनी चालू केलेल्या पंढरपूर पायी वारीला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने वेदसेवा प्रतिष्ठानच्या वतीने पायी वारीला जाणार्या भक्तांचे स्वागत, पालखीचे पूजन येथे राजापेठ चौकात १ जूनला करण्यात आले. या प्रसंगी सनातनच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.
सनातनच्या वतीने श्री. रमेश वरुडकर आणि सौ. समिधा रमेश वरुडकर यांनी पालखीचे पूजन केले. तत्पूर्वी वेदसेवा प्रतिष्ठानचे पंडित भाऊ (कुणाल) सदाव्रती यांनी पायी वारीला जाणार्या भक्तांचे स्वागत आणि पालखीचे पूजन केले. या वेळी भाविकांना सरबताचे वाटप करण्यात आले. वेदसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल वाठोडकर आणि इतर सदस्य, तसेच सनातनचे साधक श्री. हेमंत खत्री, श्री. पंकज टवलारे, श्री. विलास सावरकर यासह अनेक भाविक या वेळी उपस्थित होते.