नक्षलवादी पोलिसांवर पुलवामामधील आक्रमणसारखे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !
पोलीस चौकशीत जहाल नक्षलवाद्याची माहिती !
नागपूर – नक्षलवादी पोलिसांच्या विरोधात पुलवामामधील आतंकवादी आक्रमणसारखे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात एका जहाल नक्षलवाद्याला तेथील पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या करण्यात आलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली.
१. अटक झालेल्या नक्षलवाद्याने तेलंगाणा राज्यातील पोलिसांना दिलेल्या माहितीत नक्षलवादी खास ‘डायरेक्शनल माईन्स’ सिद्ध करण्याचे प्रयत्न करत असल्याचे मान्य केले आहे.
नक्षलवादी पोलिसांविरोधात पुलवामा हल्ल्यासारखा घातक हल्ला करण्याच्या तयारीत? जहाल नक्षलवाद्याचा चौकशीत गौप्यस्फोट#Maharashtra #Naxal #Maoist #MaharashtraNews https://t.co/knheLN3uYl
— ABP माझा (@abpmajhatv) June 2, 2023
२. चौकोनी आकाराच्या बॉक्समध्ये स्फोटके ठेवून ती ट्रॅक्टर किंवा बोलेरोसारख्या वाहनाच्या माध्यमातून दुर्गम भागातील पोलिसांच्या सशस्त्र चौक्यांवर धडकवण्याची नक्षलवाद्यांची योजना असल्याचे समोर आले आहे.
३. याखेरीज नक्षलवादी ‘लोडेड ड्रोन’ आक्रमणाच्या सिद्धतेत असल्याचेही अटक झालेल्या जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांना सांगितले.
४. गडचिरोलीसह छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या हेरगिरीसाठी अनेक वेळेला ड्रोनचा वापर यापूर्वी केला आहे; मात्र आता प्रथमच नक्षलवाद्यांनी ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांवर स्फोटकांच्या साहाय्याने आक्रमण करण्याच्या योजनेवर काम चालू केले आहे.
५. विशेष म्हणजे यापूर्वी काश्मीरमध्ये श्रीनगरमधील हवाई तळावर अशाच पद्धतीने ड्रोन आक्रमण झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगाणा राज्यांचे पोलीस सावध झाले आहेत.
६. नोटाबंदीच्या निर्णयानंतर माओवादी २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्यासाठी धडपड करतांना दिसत आहेत. रांजणगाव येथे २ नक्षल समर्थकांना ६ लाख रुपये किमतीच्या नोटा पालटून घेत असतांना अटक करण्यात आली. त्या अन्वेषणात माओवादी २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटण्यासाठी कंत्राटदार आणि व्यापारी यांच्यावर दबाव आणत आहेत.
७. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा येथून छत्तीसगड राज्यातील शिलगर येथील नक्षलसमर्थक आंदोलनाला पैसे पाठवला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकानक्षलवादाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक ! |