नंदुरबार येथे रणरागिणी शाखेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा !
नंदुरबार – येथे २ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ३५० वा शिवराज्याभिषेक दिन करण्यात आला. जितेंद्र मराठे यांनी प्रेरणा मंत्राचे पठण केले. डॉ. मनोज राज परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. सुमित परदेशी यांनी स्वराज्याविषयी माहिती दिली. उपस्थितांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेऊन शिवरायांचा जयघोष केला.