हिंदु मुलींची हत्या करणार्या लव्ह जिहाद्यांना फासावर चढवा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलना’द्वारे ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याची मागणी !
कोल्हापूर – देहलीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणात दोषी लव्ह जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा, तसेच देशभरात ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ४ जून या दिवशी झालेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’च्या माध्यमातून सरकारकडे केली. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. दीपक देसाई, जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन – ‘लव्ह जिहाद’चे प्रकार कोल्हापूर येथेही वाढत आहेत. तरी आपल्याला संघटितपणे या विरोधात कृती करावी लागेल.
२. श्री. राजू यादव, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) करवीरतालुकाप्रमुख – हिंदु युवतींना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे यापुढील काळात आपल्याला हिंदू म्हणून एकत्र यावे लागेल, तसेच मुली-युवती यांना स्वरक्षण प्रशिक्षण द्यावे लागेल.
३. श्री. युवराज शिंदे, भाजप युवामोर्चा सहकार आघाडी – कोल्हापूर येथे मदरशांमध्ये शिक्षण घेण्यासाठी आलेल्या काही अल्पवयीन मुलांना गेल्या मासात कह्यात घेण्यात आले. जे अन्य राज्यांत मिळत नाही; मात्र महाराष्ट्रात मिळते, असे कोणते शिक्षण आहे ? याचे अन्वेषण शासनाने केले पाहिजे. कोल्हापूर येथे ‘लव्ह जिहाद’चा प्रकार घडला.
४. श्री. गजानन तोडकर, शहराध्यक्ष, हिंदु महासभा – आज ‘लव्ह जिहाद’ हा आपल्या गल्लीपर्यंत येऊन ठेपला आहे. पन्हाळा येथे केवळ सामाजिक माध्यमांत ‘पोस्ट’ टाकली म्हणून हिंदु युवकांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्यात येते, याउलट चारचाकी गाडीवर उघडउघड कायद्याचा भंग करणारे लिखाण केल्यावर केवळ १ सहस्र रुपयांचा दंड करून सोडून दिले जाते ! पोलीस प्रशासनाकडून असा दुटप्पीपणा का ?
या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. किरण कुलकर्णी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, रणरागिणी शाखेच्या सौ. प्रीती पवार यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनासाठी युवासेनेचे श्री. सुनील चौगुले, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, श्री. मधुकर नाझरे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्कर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. आशिष लोखंडे, श्री. सुनील शेखर, श्री. अर्जुन आंबी यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी हातात निषेधाचे फलक धरून आणि निषेधाच्या घोषणा देत जागृती करण्यात आली.