उष्णतेच्या लाटेमुळे नवी मुंबईतील शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी !
नवी मुंबई – नवी मुंबईसह मुंबईत उन्हाचा तडाखा कायम असल्याने मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी येथील सर्व मंडळांच्या (बोर्ड) शाळा १५ जूननंतर चालू करण्याची मागणी शिवसेनेचे सानपाडा विभागप्रमुख शिरीश पाटील यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी ‘नवी मुंबईतील सर्व बोर्डाच्या शाळा १५ जूननंतर चालू करण्याच्या आदेशाचे पालन न करणार्या शाळांवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.