(म्हणे) ‘म्हशी कापता येतात; मग गायी का नाही ?’ – के. व्यंकटेश, पशुसंवर्धन मंत्री
कर्नाटकच्या नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांचा संतापजनक प्रश्न !
बेंगळुरू (कर्नाटक) – म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला. कर्नाटक राज्यात गोहत्येवर बंदी आहे. या कायद्यात काँग्रेसकडून पालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात के. व्यंकटेश यांनी हे विधान केल्याने हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे.
#Karnataka‘s Animal Husbandry and Veterinary Sciences minister, K Venkatesh said that the amendment of the bill would benefit the farmers in the state https://t.co/OzimyCPWU7
— News18.com (@news18dotcom) June 4, 2023
के. व्यंकटेश पुढे म्हणाले की, शेतकर्यांपुढे वृद्ध गुरे पाळणे आणि मेलेली जनावरे वाहून नेणे, ही मोठी समस्या आहे. मला माझ्या शेतघरामध्ये (फार्म हाऊसमध्ये) मृत गाय बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी आल्या.
‘भैंस, बैल को काटा जा सकता है गाय को क्यों नहीं?’ कर्नाटक के मंत्री के वेंकटेश के विवादित बयान से मचा घमासान
पूरी ख़बर – https://t.co/ZBmhcLtZx9#karnatakaNews #KTVenkatesh #ControversialStatement pic.twitter.com/znb46BEgtn
— Dainik Jagran (@JagranNews) June 4, 2023
गोहत्या कायदा रहित करण्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेणारके. व्यंकटेश म्हणाले की, गोहत्या कायदा रहित करण्याविषयी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल. गाय दत्तक घेण्याच्या योजनेचे काय झाले ?, याची चौकशी करण्यात येईल. गोशाळा चालवण्यासाठी पैशांची कमतरता नाही; पण त्या नीट चालवल्या गेल्या नाहीत. |
संपादकीय भूमिका
|