मणीपूरमध्ये हिंसाचार चालूच !
७ लोकांचे मृतदेह सापडले !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या मासाभरापासून चालू असलेला हिंसाचार थांबलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौर्यानंतरही येथे हिंसाचार चालूच आहे. गेल्या २४ घंट्यांत मैतेई आणि कुकी या समाजांच्या गावांवर झालेल्या आक्रमणांत अनेक लोक घायाळ झाले.
Government of India constitutes a three-member Commission of Inquiry headed by former Chief Justice of Gauhati High Court, Justice Ajai Lamba to probe incidents of violence in Manipur
Former IAS officer Himanshu Shekhar Das and former IPS officer Aloka Prabhakar are also on the… pic.twitter.com/GYNEAN9hxK
— ANI (@ANI) June 4, 2023
सुरक्षादलांनी ककचिंग भागातील सुगनू येथील जंगलातून ७ मृतदेह बाहेर काढले आहेत. हे मृतदेह २८ मे या दिवशी ख्रिस्ती कुकी बंडखोरांनी केलेल्या आक्रमणात ठार झालेल्या हिंदु मैतेई लोकांचे असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरातील १० ग्रामस्थ बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्यात हिंदु मैतेई समाजाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या मागणीच्या विरोधात ख्रिस्ती कुकी समाज हिंसाचार करत आहे. भारतीय सैन्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, ३ जून या दिवशी राज्यात ४० अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. यांतील बहुतेक शस्त्रे स्वयंचलित आहेत.